हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.८ (जिमाका)- ‘हर घर तिरंगा’ हे अभियान दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार असून स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास व देशभक्तीचा जागर व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयात या संदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य
प्रशासन प्रभोदय मुळे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे
मुख्याधिकारी आदी अधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत
सुचना देण्यात आली की, स्वातंत्र्य
लढ्याचा जाज्वल्य इतिहास व देशभक्तिचा जागर व्हावा यासाठी घरोघरी तिरंगा हे अभियान उत्साहात व्यापक प्रमाणात राबविण्याचे
नियोजन आहे. सर्व तालुके आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण
संकल्पनासह राबवावयाचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी राष्ट्र ध्वजाची
मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्व
ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्व नागरिकांना आपल्या
घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी
आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात
सक्रिय सहभागी होता येणार आहे. त्यांनी दि.१३ ते १५ या कालावधीत आपापल्या इमारती,
घरांवर किंवा कार्यालयांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्याच प्रमाणे विविध
शाळा, महाविद्यालये, विविध
सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न
करावे. या अभियानानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत
सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रमांचे आयोजन
मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे. या अभियानात तिरंगा
रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा
मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा
कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा
सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम
राबविण्यात येणार असून त्यात सर्वस्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment