गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना; फुलंब्री व वैजापूर तालुक्यातून प्रस्ताव मागविले
छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- राज्यस्तरीय योजनेंतर्गत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.प्रदीप झोड यांनी केले आहे. शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील फुलंब्री व वैजापूर या दोन तालुक्यातील पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
योजनेचा
मुलभूत उद्देश :-
१. दुग्धोत्पादनास, शेती
कामास, पशु पैदाशीस ओझी वाहण्याचा कामास उपयुक्त असलेल्या, नसलेल्या गाय, वळु, बैल
व वय झालेले गोवंश सांचा सांभाळ करणे.
२. आशा पशुधनासाठी चारा,
पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे.
३. गोवर्धन गोवंश केंद्रा
मधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे.
४. गोमुत्र, शेण इ. पासुन
विविध उत्पादने, खत, गोबर गॅस व इतर उप-पदार्थच्या निर्मितीस प्रोत्साहान, चालना
देणे.
लाभार्थी
गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती
१. संस्था
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी.
२. संस्थेचे
नजीकच्या मागील ३ वर्षाचे लेखा परीक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
३. संस्थेस
गोवंश संगोपनाचा कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा.
४. केंद्रावर
असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण चारा उत्पादनासाठी तसेच पशुधनाच्या
संगोपनासाठी स्वत:च्या मालकीची किंवा ३० वर्षाच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावरची
किमान ५ एकर जमीन असावी.
५. संस्थेने
मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी १० टक्के एवढे खेळते भाग भांडवल
संस्थेकडे असणे आवश्यक आहे.
लाभार्थी
गोशाळेच्या निवडीची प्रक्रिया तसेच विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे इ.बाबतची
सविस्तर माहिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक
पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त कार्यालयाकडे दि.२५ पर्यंत सादर
करावेत. महाराष्ट्र गो सेवा आयोग कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा
तत्सम द्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत,असेही जिल्हा पशुसंवर्धन
उपायुक्त डॉ.पी.डी.झोड यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment