महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)तर्फे कृषी प्रक्रिया विषयक पाच दिवसीय मोफत प्रशिक्षण

 


छत्रपती संभाजीनगर दि.१६(जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आणि महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळ (MSSIDC) तसेच एमएसएमई (MSME) यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.१९ ते शुक्रवार दि. २३ या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कृषी प्रक्रिया आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार असून हा प्रशिक्षण कार्यक्रम मोफत आहे.

            या प्रशिक्षणात सोयाबीन प्रक्रिया, आवळा प्रक्रिया, मसाला प्रक्रिया, मका प्रक्रिया या उद्योगाबद्दल सविस्तर माहीती दिली जाणार आहे. या क्षेत्रातील  उद्योग संधी, बाजारपेठ याबाबत तज्ज्ञ व्याख्यात्यांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. या पाच दिवशीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांकडे उद्यम रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करू इच्छिणारे सहभागी होऊ शकतात. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी कार्यक्रम आयोजक सौ.आशा कुरवाडे, (मो.७८८८०७०४१९), जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रतिभा निमकर यांच्याशी संपर्क साधावा. या प्रशिक्षनात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन श्री.डी.यु.थावरे, विभागीय अधिकारी,एमसीईडी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. प्रवेशाची अंतिम दि.१९ ऑगस्ट २०२४  आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी पत्ता महाराष्ट्र  उद्योजकता विकास केंद्र,ए-३८, एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा