अवयव दानाबाबत जनजागृती आवश्यक- पालकमंत्री सत्तार

 


छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- अवयव दान हे रुग्णाला जीवनदान देऊ शकते. त्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आज अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दि.३ ऑगस्ट या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. शिराझ बेग तसेच सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा