गर्भलिंगनिदानास प्रतिबंध ही आपली सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर दि.२१(जिमाका)- प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य तर आहेच शिवाय ती सामाजिक जबाबदारीही आहे. ही जबाबदारी आपण चोखपणे पार पाडावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

            जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आज प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयांनद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकृष्ण लांजेवार, आर. एम. ओ डॉ. प्रशांत बढे तसेच सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय पी.बी. वाबळे तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, गर्भलिंग निदान आणि त्यानंतर घटणारा मुलींचा जन्मदर आणी व्यस्त होत चाललेले लिंग गुणोत्तर प्रमाण ही बाब शोभनिय नाही, मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य तर आहेच शिवाय ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. डॉक्टरांनी आपल्यास्तरावर पालकांचे समुपदेशन करावे. आपल्यामार्फत दिली जात असलेली आरोग्य सेवा ही दर्जेदार असावी यावर सगळ्यांनी भर द्यावा,असेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना,  तीर्थक्षेत्र दर्शन योजना या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व या योजनांच्या लाभार्थ्यांच्या वैद्यकीय तपासण्या विनाविलंब करुन द्याव्या व त्यासाठी जिल्ह्यात दि.२३ व २४ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात यावे व त्या शिबिरात सर्व लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक प्रमाणपत्र देण्यात यावे अशा सुचनाही दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा