पोलीस आयुक्तांचे आदेश; ड्रोन व तत्सम हवाई उड्डाण क्रियांना प्रतिबंध

 छत्रपती संभाजीनगर दि.६ (जिमाका)- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोलद्वारे संचलित  माय्क्रॊ लाईट एरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना दि.३१ ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंध घालण्यात येत असल्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत. पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस आयुक्तांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई यास अपवाद असेल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांनुसार हे प्रतिबंध घालण्यात आले असून  या आदेशाचे उल्लंघन झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा