महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019: प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर दि.२ (जिमाका)- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत पात्र शेतकऱ्यांनी दि.७ पर्यंत  आधार  प्रमाणिकीकरण करावे,असे  आवाहन  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.

            शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे."MJPSKY - 2019 योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेस पात्र असलेल्या संबंधीत शेतकऱ्यानी त्यांचे आधार प्रमाणिकरण करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे .आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे.आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महा- आयटीमार्फत SMS देण्यात आला आहे. तसेच  सर्व बँकानी देखील संबंधीत सर्व शेतकऱ्यांना व्यक्तीशःकळविणे आवश्यक आहे.  योजनेअंतर्गत विशिष्ट क्रमांकासह यादीमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या परंतु अद्याप आधार प्रमाणीकरण न झालेल्या मयत / वारस लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा सुरू करण्यात आलेली असुन आधार प्रमाणीकीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यानी त्यांचे आधार प्रमाणीकरण दि.7 सप्टेंबर 2024 पर्यंत पुर्ण करावयाचे आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा बंद होणार आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास योजनेचा लाभ मिळु शकनार नाही. योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द झालेल्या यादीतील 559 शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप पावेतो पुर्ण केलेले नाही.त्यांनी आधार प्रमाणीकरण करताना आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत शेतकऱ्यानी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवुन तक्रारीबाबत आवश्यक ती कागदपत्रे आपले बँक शाखेत तात्काळ जमा करावीत. आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या  शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी मुळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेवून संबंधीत बँकेत, CSC व आपले सरकार सेवा(ASSK ) केंद्रावर जाऊन तातडीने आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाउपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, वि.का. संस्था कार्यालये तसेच तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयांशी संपर्क साधावा.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा