महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पदवीदान सोहळा सोमवारी (दि.१६)
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पदवीदान सोहळा सोमवार दि.१६ रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव यांनी दिली आहे.महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथे हा सोहळा होणार असून या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती न्या. अभय ओक हे राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या.उज्ज्वल भुयान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व विद्यापीठाचे प्र कुलपती न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,असे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment