एम.सी. ई. डी. व सारथी यांच्या तर्फे कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी ‘आले प्रकिया प्रशिक्षण’
छत्रपती संभाजीनगर दि.९ (जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) तर्फे आयोजित आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी, पुणे) तसेच महाराणी सईबाई सारथी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत आले प्रकिया (जिंजर प्रोससिंग) तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मोफत व खास महिलाकरिता असून आले (जिंजर) वर प्रक्रिया करून आपणास काय उद्योग व्यवसाय करता येतात. या विषयी प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे
या प्रशिक्षणामधे आल्यापासून पावडर निर्मिती,
आल्या पासून चिप्स बनविने, आल्यापासून पाकवडी बनविणे, आल्याचे तेल बनविणे, आल्यापासून
मुरंबा, आल्यापासून कँडी, आल्याचे लोणचे, तयार करणे आल्यापासून सुंठ निर्मिती या विषयावर
तज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणामधून महिलांनी सक्षम
होऊन स्वतःचे उद्योग उभारावे हा उद्देश आहे. या प्रशिक्षणामधे तांत्रिक प्रशिक्षणाबरोबर
उद्योगसंधी मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजनांची माहिती, उद्यम रजिस्ट्रेशन
करून घेणे. तसेच बाजार पेठ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी किमान
आठवी पास असावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, टीसी, महार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वय
१८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे, तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया मागास
असल्याबाबत प्रमाणपत्र झेरॉक्स प्रतीत आवश्यक आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी प्रतिभा निमकर (9028056800) जिल्हा प्रकल्प समन्वयक
MCED छत्रपती संभाजी नगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम
थोटे यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ता:-
Plot No.A-38 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, देवगिरी कॉलेज जवळ MIDC रेल्वे स्टेशन
ITI कॉलेज च्या मागे छत्रपती संभाजीनगर.
०००००
Comments
Post a Comment