संकटग्रस्त बालकांसाठी हेल्पलाईन १०९८
छत्रपती संभाजीनगर दि.३ (जिमाका) – बालकामगार, बालभिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेले बालके तसेच सापडले बालके मदतीची आवश्यकता असलेले संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत करण्यासाठी १०९८ ही हेल्पलाईन असून त्याद्वारे अशा बालकांना मदत मिळवून देता येईल,असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरीता भारत सरकार महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट शासन, महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत ०ते १८ वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यन्वित आहे. संकटग्रस्त बालकांना २४X७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सेवेचा लाभ बालक स्वत: घेऊ शकतो. किंवा इतर कोणीही सेवेद्वारे बालकाला मदत मिळवू देऊ शकतात,असे कळविण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment