मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजना; अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज करु नये

 छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’,  योजनेसाठी कन्नड तालुक्यात ९२ हजार ०९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९० हजार ९५७ अर्ज पात्र ठरले आहेत. तथापि, अर्ज छाननी करतांना १२ पुरुष उमेदवारांनी अर्ज केल्याचे निदर्शनास आले आहे. असे अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले आहेत.  तरी योजनेसाठी अपात्र ठरणारे अथवा पुरुष अर्जदारांनी अर्ज करु नये. असे अर्ज पात्र केले जाणार नाहीत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी  एकात्मिक बालविकास सेवा योजना  प्रकल्प कन्नड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा