रब्बी ज्वारी खरेदीस दि.३० पर्यंत मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर दि.१०(जिमाका)- किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४(रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्यास केंद्र शासनाने दि.३१ ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत दि.३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे असे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी कळविले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम व संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे विनंती केली होती. त्यामुसार केंद्रशासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीची मुदत दि.३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment