प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२४; नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत तक्रार करावी; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर दि.३ (जिमाका) – प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम २०२४ साठी ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा संरक्षण घेतले असेल त्यांनी अतिवृष्टी, वादळ तसेच अन्य नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत पिकविमा कंपनीकडे तकार करावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

यासंदर्भात कृषी विभागाने कळविले आहे की, प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप २०२४ मध्ये चोलामंडलम एम एस जनरल इंन्सुरन्स कं.लि.यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढग फूटी, महापूर, दीर्घकाळ पाणी साचून झालेले नुकसान व चक्रीवादळ,वीज कोसळून नैसर्गिक आग इ.कारणांमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास तसेच काढणीपश्चात (१४ दिवस) झालेले नुकसान झालेले असल्यास; खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकरी बाधवांनी पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास ७२ तासात पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार करावी.

नुकसानग्रस्त पिकविमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात. पिकविमा कंपनीला तक्रारी देण्यासाठी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) अॅप्लिकेशन पुढील लिंक द्वारे गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड  करावे.

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central या अॅप्लिकेशन चा वापर करून त्याद्वारे नुकसानीची माहिती द्यावी.

            तसेच 14447 या टोल फ्री क्रमांक/पिकविमा प्रतिनिधी कार्यालय/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांनाही नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.अधिक माहितीसाठी तालुका विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले.

 तालुका विमा प्रतिनिधी यांचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे-

छत्रपती संभाजीनगर-अभिषेक खेडकर संपर्क क्र. 9423237792,

पैठण-राम घेगडे संपर्क क्र. 9284067983,

फुलंब्री- भारत अंभोरे संपर्क क्र. 8806137994,

वैजापूर- सिताराम जाधव संपर्क क्र. 7387796218,

गंगापूर- प्रवीण जगताप संपर्क क्र.8275324344,

खुलताबाद- महेश भिंगारे संपर्क क्र. 9011683804,

सिल्लोड- गजानन पांढरे संपर्क क्र. 8999454263,

कन्नड- कौस्तुभ भिंगारे संपर्क क्र. 9823984998,

सोयगाव- गजानन जाधव संपर्क क्र. 9766092543,

जिल्हा व्यवस्थापक- ईश्वर भिंगारे संपर्क क्र. 8551020314,

जिल्हा समन्वयक - दादासाहेब पवार संपर्क क्र. 880663111.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा