पिंप्री राजा येथे वार्धक्यजन्य आजार शिबिरात १७२ रुग्णांची तपासणी

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांसाठी वार्धक्यजन्य आजार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन पिंप्री राजा येथे गुरुवारी (दि.१२) करण्यात आले. या शिबिरात १७२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

            युनानी दवाखाना पिंप्री राजा  येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन शिबीराचे उद्घाटन डॉ. रुबीना शेख यांनी  केले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ शकील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती विद्या सानप, डॉ वासेफ सिद्दीकी, महाराष्ट्र युनानी संघटनेचे प्रतिनिधी टी एम खान आदी उपस्थित होते.

यांनी रूग्ण तपासणी व उपचार केले.

            जिल्हा आयुष अधिकारी डॉ शेख शकील यांनी जिल्ह्यात उपलब्ध आयुष सेवेबाबत माहिती देवून योग, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म व अवयव दानाचे महत्व सांगून युनानी उपचार पद्धती, मिझाज, हिजामा व इलाज बिल तदबिर बाबत मार्गदर्शन केले. योगासनाचे  विशेष सत्र आयोजन करून माहिती व आजारानुसार योगासन सल्ला देण्यात आला.

            या शिबिरात १७२ रुग्णांची तपासणी करून उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला तसेच ४१ रुग्णांच्या प्रयोगशालेय तपासण्या आरोग्य उपसंचालक डॉ भूषण कुमार रामटेके यांचे सूचनेवरून या महालॅब मार्फत मोफत करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नागेश सावरगावकर यांनी शिबिराला भेट देवून ग्रामस्थांशी व रुग्णांशी संवाद साधला.

            शिबिराच्या यशस्वीतेसाठी मजहर सय्यद, जावेद सय्यद, लॅब टेक्निशियन हासिब शेख, सुपरवायझर प्रधान, सागर नरवाडे, फरहान आणि सर्व आशा स्वंसेविकांनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा