माजी सैनिकांचा पेन्शन, ‘स्पर्श’ संबंधित अडचणींच्या निराकरणासाठी दि.२७ रोजी मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- मराठवाडा विभागातील सर्व आठ जिल्ह्यामधील (छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव ) माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व सर्व वयोवृद्ध सैनिकांकरीता ९७ आर्टीलरी ब्रिगेड येथील सर्वत्रा ऑडीटोरियम छावणी येथे शुक्रवार दि.२७ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पेन्शन व ‘स्पर्श’ संबंधी असलेल्या सर्व अडचणीचे निरासन करण्याकरीता प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालय (अधिकारी) पुणे येथील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या
मेळाव्यामध्ये पेंशन व स्पर्शसंबंधी असलेल्या शंका व अडचणीचे निरासनाव्यतिरिक्त ‘वन
रेंक वन पेंशन’ व अन्य शासकीय योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन प्रधान नियंत्रक
रक्षा लेखा कार्यालय (अधिकारी) पुणे येथील कार्यालयतील प्रतिनिधी यांच्यामार्फत
करण्यात येईल. मेळाव्यात येताना पेंशनसंबंधी सर्व मूळ कागदपत्रे व अडचणी संबंधी
वैयक्तिक अर्ज हिंदी अथवा इंग्रजीमध्ये तीन प्रतीत आणावा. माजी सैनिक व त्यांच्या
कुटुंबियाना लिहिण्या – वाचण्यासंबंधी अडचण असल्यास त्यांनी त्यांच्या कुटुंबातील
योग्य व्यक्तीस सोबत आणावे म्हणजे प्रतिनिधी, प्रधान नियंत्रक रक्षा लेखा कार्यालय
(अधिकारी) पुणे यांना त्यांच्या अडचणी समजून घेण्यास व त्यांचे निरासन करण्यात मदत
होईल. मेळाव्यास येणाऱ्या सर्व माजी सैनिकांकरीता मध्यवर्ती बसस्थानक, सिडको
बसस्थानक, व रेल्वे स्टेशन ९७ आर्टीलरी
ब्रिगेड ‘सर्वत्रा ऑडीटोरियम’ छावणी पर्यंत जाण्या – येण्या करीता सैनिकी
परिवाहनाची तसेच चहापान व दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यास सर्व
सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व सर्व
वयोवृद्ध सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
ब्रिगेड कमांडर ९७आर्टीलरी ब्रिगेड व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती
संभाजीनगर यांनी केले आहे. अधिक माहिती करीता दूरध्वनी ०२४०-२३७०३१३ येथे कार्यालयीन
वेळेत संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment