सार्वजनिक गणेशमंडळ स्थापनेसाठी ४९० पैकी २८९ मंडळांना परवानगी; सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरु
छत्रपती संभाजीनगर दि.५(जिमाका) - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेसाठी परवानगी देण्यासाठी ४९० अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी २८९ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन , ऑफलाईन प्रक्रिया सुरु असून एक खिडकी सुरु आहे. नोंदणी प्रक्रिया करता यावी यासाठी शनिवार (दि.७) व रविवार (दि.८) या सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे, असे सह आयुक्त धर्मादाय विशाल शेंडे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात
कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम
१९५० चे कलम ४१- क अन्वये सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमाकरीता लोकवर्गणी जमा करणे
कामी परवानगी देण्यात येत असते. याकरीता धर्मादाय विभागाचे संकेत स्थळ https://charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Event Registration या
सदराखाली ऑनलाईन नोंदणी करता येते. तसेच ज्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसेल,
अशा इच्छुक मंडळांना विहीत नमुन्यात अर्ज सादर केल्यास ऑफलाईन परवानगी देण्यात
येते.
छत्रपती संभाजीनगर विभागात इच्छुक मंडळांना
आवाहन करण्यात आले आहे की, सध्या गणेश उत्सवाचा कालावधी असून, अनेक मंडळ गणेश
स्थापनेकरीता परवानगी घेणे कामी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करीत आहेत. सद्यस्थितीत
कार्यालयात एकूण ४९०अर्ज विक्री झाले असून ४३ऑनलाईन व ३१० ऑफलाईन अर्ज आले आहेत. ३१०
अर्जांपैकी २८९ अर्जांना परवानगी देण्यात आली असून परवानगी देण्यासाठी ‘एक खिडकी’
सुरु केली आहे.
‘एक
खिडकी’च्या माध्यमातून कार्यालयात अर्ज विक्री, स्विकृती, तपासणी व तात्काळ
परवानगी देण्यात येत आहे. परवानगी देण्याची कार्यवाही साठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी
संबंधित कामकाज करत आहेत. तसेच गणेश उत्सवाच्या परवानगीसाठी शनिवार दि.७ व रविवार दि.८
या दोन्ही दिवशी सुटी असली तरी कार्यालय सुरु ठेवण्यात आले आहे.
लोकवर्गणी साठी परवानगी घेण्याकरीता ऑनलाईन,
ऑफलाईन अर्जांच्या विहीत नमुन्या सोबत ठरावाची प्रत, जागामालकाचे ना हरकत पत्याचा
पुरावा म्हणून लाईट बिलाची मुळ प्रत व आधार कार्डची प्रत असणे आवश्यक, पदाधिकाऱ्यांचे
ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, इलेक्शन कार्ड इ.) मागील वर्षाचा हिशोब, मागील
वर्षी घेण्यात आलेल्या परवानगीची प्रत सादर करावी व परवानगी मिळवून घेण्याची कार्यवाही करावी,असे
आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment