दि.२५ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबर या कालावधीत ‘युवा संवाद’ अभियान

 छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्यासाठी ‘युवा संवाद’ हे अभियान दि.२५ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये यात सहभागी होणार आहेत.

            महाविद्यालयीन युवक युवती उद्याचे नागरीक आहेत, त्‍यांची जडण घडण म्‍हणजेच देशाची जडण घडण. शैक्षणीक अभ्‍यासक्रम पूर्ण करतांनाच त्यांचा सर्वांगीण विकास व्‍हावा यासाठी या अभियानात प्रयत्न व प्रबोधन केले जाणार आहेत. त्यात मुख्यत्वे करुन सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्‍यसनाधिनता, रॅगींग यासारख्या मुद्यांवर युवा वर्गाचे प्रबोधन केले जाणार आहे.

उपक्रमाचे उद्दिष्‍ट   -

१.      महाविद्यालयीन युवक / युवती व प्रशासन यांच्‍यात समन्‍वय / संवाद साधणे.

२.     असामाजिक तत्‍वे / कार्यापासून दूर रहाणे संदर्भात मार्गदर्शन करणे.

३.     महाविद्यालयात विद्यार्थ्‍यांमध्‍ये संस्‍कार शिक्षणाची पूर्नरावृत्‍ती करणे.

४.    व्‍यक्तिमत्‍व विकास या बाबत मार्गदर्शन करणे, त्‍यांच्‍यातील आत्‍मविश्‍वास वाढवणे.

५.    व्‍यसनमुक्‍ती कार्यक्रम राबविणे.

६.     महत्‍वाच्‍या शासकीय योजनांची युवकांना तोंडओळख करुन देणे.    

७.    मतदार जागृती, स्‍वच्‍छता अभियान या बाबत चर्चा करणे.

८.     स्‍पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करणे.

९.     सोशल मिडीयावरील आचारसंहितेबाबत मार्गदर्शन करणे.        

१०. सायबर गुन्ह्यांसंदर्भात सजगता निर्माण करणे.

११.  स्‍त्री- पुरुष समानता, स्‍त्री सन्‍मान बाबत प्रबोधन.

हा उपक्रम महाविद्यायातील युवक / युवतींसाठी असेल. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी एनएसएस व एनसीसी प्रमुख यांचे मार्फत या कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे.  प्राचार्यांनी आयोजनाबाबत उपजिल्‍हाधिकारी सामान्‍य प्रशासन प्रभोदय मुळे (मो. नं.-७५८८८११११५) यांच्‍याशी संपर्क साधावा.  इतर ठिकाणच्‍या महाविद्यालयाने त्‍यांचे कार्यक्षेत्राचे संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा करावी. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. सहसंचालक उच्‍च शिक्षण, सहसंचालक उच्‍च व तंत्रशिक्षण, उपजिल्‍हाधिकारी सामान्‍य प्रशासन, संबंधीत उपविभागीय अधिकारी,संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडावयाची आहे. या कार्यक्रमात सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा