आर्थिक साक्षरता कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- येथील सुक्ष्म अर्थसहाय्य उद्योग संघटनतर्फे आज आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, नाबार्ड चे जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर, तहसिलदार पल्लवी लिगडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, तसेच देवेंद्र शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कर्ज मंजूरी व परतफेड, आर्थिक नियोजन व वित्तीय फसवणूकीपासुन बाळगावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
०००००

Comments
Post a Comment