शिक्षक दिन सोहळ्यात १२८ शाळांचा गौरव; स्पर्धाक्षम, संस्कारक्षम व आरोग्यक्षम विद्यार्थी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 











छत्रपती संभाजीनगर दि.५(जिमाका)- शिक्षकांना नवनवीन उपक्रम राबवून आदर्श समाज घडविण्याची संधी असते. आई वडील अतिशय विश्वासाने मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. त्या विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम, संस्कारक्षम, आरोग्यक्षम घडविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी यांनी केले.

            शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित नवोपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार सन्मान सोहळ्यात आज जिल्ह्यातील १२८ शाळांना गौरविण्यात आले.

        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अरुणा भुमकर  यांची याप्रसंगी उपस्थिती होती .

           मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना म्हणाले की, आपण विद्यार्थी, शाळा, पालक व गावासाठी काय करू शकतो असा विचार करून समाजाभिमुख काम करणे गरजेचे आहे. शाळेला गावाची मदत निश्चितच मिळते. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षक व शिक्षण आहे.

            डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन अरुणा भुमकर यांनी मानले. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी मार्गदर्शन केले

           याप्रसंगी अजित राजळे (शरीफपूर ), मल्हारी गोसावी (आंचलगाव ), प्रकाश राठोड ( मंबापुरवाडी ), बाळकृष्ण बखरे (गीरसावळी ), गणेश गव्हाणे (बनगाव), निर्मला झेंडे ( चिंचखेडा ),अशोक पाटील ( तारूपिंपळवाडी ), शिवनाथ वाडेकर ( नेवपूर ), सुजित फलके ( गोविंदनगर ) यांनी आपल्या शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले.

 सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, निता श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, हेमंत उशीर, दिपाली थावरे, क्रांती धसवाडीकर, श्रीराम केदार, रंगनाथ आढाव, अनिल पवार, विलास केवट, रमेश ठाकूर,  संगीता सावळे, संगीता गायकवाड, राजेश हिवाळे, प्रशांत हिवर्डे, प्रवीण लोहाडे, कृष्णा शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा