शांतता समिती बैठक: खुलताबादची सामाजिक एकोप्याची परंपरा कायम राखू-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- आगामी काळात गणेशोत्सव, व जरजरी बक्ष उर्स महोत्सव होणार असून खुलताबाद शहरातील नागरिकांनी नेहमी जपलेली परंपरा कायम राखून सर्व उत्सव सामाजिक एकोप्याने सहभागी होऊन साजरे करू, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.

            जर जरी बक्ष यांचा ७३८ वा उर्स महोत्सव व गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात ही बैठक पार पडली.

            पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड,तहसीलदार स्वरूप कंकाळ, मुख्याधिकारी विक्रम दराडे, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे,गट विकास अधिकारी प्रकाश नाईक,शांतता समिती सदस्य,सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

            बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, सर्वधर्म हे मानवतेची शिकवण देतात. सामाजिक एकोपा हा विचार प्रत्येक धर्माचा गाभा आहे. सर्व धर्मियांनी परस्परांच्या उत्सवात आनंदाने सहभागी होत उत्सवाचा आनंद वृद्धीगत करावा. उत्सव काळात असामाजिक तत्वाना पायबंद घालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. खुलताबाद तालुका व शहराची सामाजिक एकोप्याची परंपरा कायम राखू या, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले.

            पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी सांगितले की, मोबाईल फोनच्या अवाजवी व चुकीच्या वापरामुळे अनेकदा अफ़वा व चुकीची माहिती पसरवली जाते, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक पालकाने आपली मुलं मोबाईल वर काय शेअर करतात यावर लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी केले.

            शांतता समिती सदस्य आबीद जहागीरदार, परसराम मालोदे, विकास कापसे, ज्ञानेश्वर नलावडे, दिनेश सावजी, अरुण तंबारे, पोलीस पाटील रेखा गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

            प्रास्तविक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा