कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
छत्रपती संभाजीनगर दि.9 (जिमाका) – सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. कपाशीच्या पिकामध्ये डोमकळ्या (पूर्णपणे न उमलेल्या कळ्या) दिसून येत आहेत, अशा डोंमकळ्यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या दुसऱ्या अवस्थेतील अळ्या असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कपाशी पिकाचे लगेच सर्वेक्षण करुन या रसशोषक किडी तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
रस शोषण करणाऱ्या किडी
: मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी इ.
बोंडअळी : गुलाबी बोंडअळी
आर्थिक नुकसान पातळी :
मावा : 15 ते 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त
झाडे किंवा 10 मावा, पान
तुडतुडे : 2 ते 3 पिल्ले,
पान
फुलकिडे : 10 फुलकिडे, पान
पांढरी माशी : 8 ते 10 प्रौढमाश्या,
पान
गुलाबी बोंडअळी : 5 ते
10 टक्के कळ्या, फुले, बोंडाचे नुकसान किंवा 8 ते 10 पतंग, सापळा सलग 3 दिवस
एकात्मिक व्यवस्थापन
Ø शेताच्या
कडेने तसेच पडीक जमीनीतील किडींच्या पर्यांयी वनस्पती नष्ट कराव्यात.
Ø शेताची
कोळपणी व खुरपणी करुन शेत तण विरहित ठेवावे.
Ø रस
शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्र खताचा संतुलित
वापर करावा.
Ø पांढऱ्या
माश्यांना आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये 12 ते 15 पिवळे थिकट सापळे प्रती हेक्टरी
लावावेत.
Ø मित्र
किटकांचे संवर्धन करावे.
Ø रस
शोषक किडीच्या नियंत्रणासाठी लिकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लिकॅनी 1.15% डब्ल्युपी
50 ग्रॅम या जैविक किटकनाशाकाची प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.
Ø गुलाबी
बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी 4 ते5 कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग
पकडण्यासाठी 25 सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
Ø पक्ष्यांना
बसण्यासाठी 25 पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून
शेतातील किडी टिपून खातील.
Ø प्रादुर्भावग्रस्त्
व गळलेली पाते, बोंडे जमा करुन नष्ट करावी.
Ø गुलाबी
बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात
Ø गुलाबी
बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामाटॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधिलमाशीच्या अंड्याचे
कार्ड (1.5 लाख अंडी / हे) पिकावर लावावेत.
Ø 5
टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन 10000 पीपीएम 10मिली किंवा 1500 पीपीएम
25मिली किंवा ॲझाडीरॅक्टीन 3000 पीपीएम 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून
प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
Ø किडीने
आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतरच लेबल क्लेम नुसार पुढील रासायनिक
किटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
किडी
तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, मावा
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
फ्लोनीकॅमीड 50% डब्ल्युजी किंवा थायामिथोक्झाम 25% डब्ल्युजी मात्रा
प्रति 10लि.पाणी 2 ग्रॅम
डायफेन्थुरॉन 50 % डब्ल्युपी 12 ग्रॅम,बुप्रोफेझीन 25 % एससी 20
मिली,फिप्रोनील 5 % एससी 30 मिली, टॉल्फेनपायरॅड 15 ईसी 20 मिली, ॲसीफेट 50 %+
इमिडाक्लोप्रीड 1.8 % 20 ग्रॅम, फिप्रोनिल 5 % + बुप्रोफझिन् 20% एससी 20 मिली,
फिप्रोनिल 4 % + ॲसिटामिप्रिड 4 % एससी 20मिली, पायरीप्रॉक्सीफेन 5 % +
डायफेंथियुरॉन 25 % एसई 20 मिली, क्लॉथियानिडिन 3.5 % + पायरीप्रॉक्सीफेन 8 % 25
मिली, पायरीप्रॉक्साफेन 8 % + डिनोटेफुरान 5 % + डायफेंथियुरॉन 18 % एससी 12 मिली,
डायफेंथियुरॉन 30 % + पायरीप्रॉक्सीफेन 8% एसी 20 मिली, डिनोटेफुरान 4 % + ॲसीफेट
50 % एसजी 17.6 ग्रॅम.
किडी
पांढरी माशी, तुडतुडे
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
पायरिप्रॉक्सीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रिन 15 % ईसी 12 मिली
बीटा-सायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रिड 19.81 % ओडी 4 मिली.
बुप्रोफेझिन 15 % + ॲसीफेट 35% डब्लुपी 25 ग्रॅम.
पिठ्या ढेकूण
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
क्लोरपायरिफॉस 20 % ईसी 20 मिली
ब्रुप्रोफेझीन 25 % ईसी 20 मिली
लाल कोळी
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
डायकोफॉल 18.5 % ईसी 54 मिली
स्पायरोमेसिफेन 22.9 % एससी 12 मिली
गुलाबी बोंडअळी
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
प्रोफेनोफॉस 50 % ईसी 30 मिली
क्विनालफॉस 20 % एएफ 25 मिली
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली
थायोडीकार्ब 75 % डब्ल्युपी 20 ग्रॅम
इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 4 ग्रॅम
स्पिनोसॅड 45 % 4 मिली
क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 % एससी 3 मिली
फ्ल्युबेन्डामाईड 36.35 % एसी 2.5 मिली
थायमिथोक्झाम 12.6 % + लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 % झेडसी 4 मिली
क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 9.3 % + लॅमडा साहॅलोथ्रिन 4.6 % झेडसी 5 मिली
पायरीप्रॉक्सीफेन 5 % + फेनप्रोपॅथ्रिन 15 % ईसी 10 मिली
प्रोफेनोफोस 40 % + सायपरमेथ्रीन 4 % ईसी 20 मिली
तुडतुडे फुलकिडी, पांढरी माशी, मावा, गुलाबी बोंडअळी
किटकनाशके (मात्रा प्रति 10 लि.पाणी)
फिप्रोनिल 15 % + फ्लॉनिकॅमिड 15 % डब्लूडीजी 8 ग्रॅम
ॲसिटामिप्रिड 25 % बायफेन्थ्रीन 25 % डब्लूजी 3.2 ग्रॅम
ॲसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.80% एसपी 20 ग्रॅम
इमामेक्टिन बेंझोएट 1.5 % + प्रोफेनोफोस 35% डब्लूडीजी 14 ग्रॅम
क्लोरपायरीफॉस 50%+ सायपरमेथ्रीन 5 % ईसी 20 मिली
वरील कटीकनाशकाचे प्रमाण
साध्या पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. शेतात कीटकनाशकाचे
द्रावण करतानी व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. पायरेथ्रॉईड
गटातील कीटकनाशकाची (लॅमडा सायहॅलोथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअगोदर सुरु करु नये.
यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.
विविध किड आणि रोग नियंत्रण उपाययोजना
भात पिकावर खोड किडीचा नियंत्रणासाठी
फ्रिप्रोनिल 5. सी.एस %@20 मि किंवा लि. फ्लुबेंडामाईड 39.सी.एस % 35 @ 2 लिटर पाण्यात मिसळून फवारणी 10 मिली प्रती 5 पावसाची उघडीप पाहून
करावी.
कापसावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी
5 % निंबोळी अर्क पावसाची उघउीप पाहून फवारावे.
खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम 11 टक्के एससी 7 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकाची आलटून पालटून 10
मिली प्रति 4 पावसाची उद्याड बघून फवारणी करावी.
स्पोडोप्टेरा अळीचा आगाऊ अंदाज घेऊन
नुकसान टाळण्यासाठी प्रती 5 फेरोमन सापळे लावावेत.
00000
Comments
Post a Comment