मराठवाडा मुक्तीसंग्राम दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन दि.१५ सप्टेंबर पासून
छत्रपती संभाजी नगर दि.१३( जिमाका ) - भारत सरकारच्या सूचना आणि प्रसार मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सिद्धार्थ गार्डन येथे ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन दि.१५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायं ६ यावेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. नागरिकांनी या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
Comments
Post a Comment