मराठा लाईट इन्फंट्रीच्या पेन्शनधारकांच्या माहितीचे अद्यावतीकरण
छत्रपती संभाजीनगर दि.9 (जिमाका) – जिल्ह्यातील मराठा लाईट इन्फट्री च्या सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पेन्शन संबंधित माहिती अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी मराठा लाईट इन्फट्रीच्य माजी सैनिक व माजी सैनिक विध्वांनी अभिलेख कार्यालयात आपली कागदपत्र तातडीने जमा करावी. ते त्यांचे रेकॉर्ड अद्यावत करुन कागदपत्र स्पर्श (SPARSH-System for Pension Administration - Raksha) ला पाठविण्यात येईल. जेणे करुन पेंशन संबंधीत अडचणी दुर होतील. जिल्ह्यातील मराठा लाईट ईन्फट्री च्या सर्व माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी आपले कागदपत्र लवकरात लवकर अभिलेख कार्यालयास परस्पर पाठविण्यात यावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कागदपत्रांची यादी याप्रमाणे- स्वत:च्या आणि जोडीदारावर अवलंबून असलेल्या आधार कार्डाच्या छायांकीत प्रती, स्वत:च्या आणि जोडीदारावर अवलंबून असलेल्या पॅन कार्डाच्या छायांकीत प्रती, छायांकीत प्रती पेन्शन पास बुक, नवीनतम ई-मेल आय-डी, कॉलिंग आणि व्हॉट्सॲप मोबाइल, आधार, पॅन, बँक पेन्शन खाते क्रमांकाशी जोडलेले असावेत.
Comments
Post a Comment