विधानसभा निवडणूक २०२४; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्था आढावा

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करुन अहवाल द्यावा,असे निर्देशही दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आज ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे,पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी,उपजिल्हा निव्डणूक अधिकारी देवेंद्र कटके,उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, डॉ. सुचिता शिंदे, निलम बाफना, चेतन गिरासे, संतोष गोरड, उमाकांत पारधी, प्रवीण फुलारी तसेच दुरदृष्यप्रणालीद्वारे लतिफ पठाण व अरुण जऱ्हाड व तहसिलदार, पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

            बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मागणीनुसार पोलीस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करणे, पोलीस बंदोबस्त नियोजन करणे, स्ट्रॉंग रुम, मतमोजणी केंद्र, साहित्य वाटप व स्विकृती केंद्र अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाचा पोलीस बंदोबस्त, संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांबाबत पोलीस बंदोबस्त व कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन,  निवडणूक विषयक गुन्ह्यांची स्थिती, आचारसंहिता विषयक गुन्ह्यांची स्थिती, परवानाधारकांचे शस्त्र जमा करणे, गत लोकसभा व विधानसभा निवडणूकीत झालेले रोकड जप्ती, अंमली पदार्थ, मद्य इ. विषयक जप्ती कारवाई. समाजकंटकांविरुद्ध करावयाची प्रतिबंधात्मक कारवाई इ. बाबत माहिती सादर करुन आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत निर्देश देण्यात आले.

            जिल्ह्यात गणेश विसर्जन व ईद मिरवणूकांबाबतही  महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वय राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा