अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ; आज (दि.४) नवउद्योजक मेळावा
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बुधवार दि/४ व गुरुवार दि.५ रोजी नवउद्याजेक महामेळावा व उद्योजकीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि.४ रोजी सकाळी ११ वाजता श्रीहरी पॅव्हेलिअन, D – Mart शेजारी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या मेळाव्यास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,असे महामंडळाच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment