जिल्ह्यात दि.१६ ची सुटी कायम
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- राज्यात सोमवार दि.१६ रोजी जाहीर केलेली सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी व त्याबदल्यात दि.१८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा अशी अधिसुचना शासनाने जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन जिल्ह्यात सोमवार दि.१६ रोजी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
०००००
Comments
Post a Comment