व्यसनमुक्ती सप्ताहःआज (दि.2) पासून विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर दि.1(जिमाका)- महात्मा गांधी जयंतीपासून दि.2 ते 8 ऑक्टोंबर पर्यंत व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात तृप्ती फाऊंडेशन, चंदन युवक शिक्षण क्रीडा मंडळ, विश्वकर्मा कला अकादमी, महिला मंडळ व नेहरु युवा केंद्र, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्तविद्यमाने हे कार्यक्रम जिल्ह्यात राबविले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने व्यसनमुक्त जीवन, आरोग्य, कुटुंब कल्याण, कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग, हिवताप, निर्मूलन, डेंग्यु निर्मूलन, पल्स पोलिओ, अंमली पदार्थ सेवन विरोधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची
रुपरेषा याप्रमाणे-
बुधवार
दि.2 रोजी सप्ताहाचे उद्घाटन, स्थळ- महात्मा गांधी पुतळा, वेळ सकाळी 8 वा. राष्ट्रीय
व्यसनाधिनता प्रतिरोध दिन, कुष्ठरोग व कर्करोग स्वच्छता दिन सुशिलाबाई देशमुख
महाविद्यालय, रामनगर येथे होणार आहे.
दि.3
रोजी स्थळ- बबनराव ढाकणे, माध्यमिक विद्यालय, चिकलठाणा. वेळ स.7 वा. अध्यक्ष
मुख्याधापक गणेश राजमाने, प्रमुख पाहुणे : विलास चंदणे, कार्यक्रम : व्यसनमुक्तीवर
व्याख्यान, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत स्पर्धा, प्रदर्शन, भक्ती गीत.
दि.4
रोजी, स्थळ : राधाकृष्ण प्राथ.माध्यमिक विद्यालय, जयभवानी नगर एन -4 वेळ स.7 वा. अध्यक्ष
एस.एम. गादीमोड, प्रमुख पाहुणे : विलास चंदणे, डॉ.संकपाळ कार्यक्रम :
व्यसनमुक्तीवर व्याख्यान, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत स्पर्धा, प्रदर्शन,
भक्ती गीत.
दि.5 रोजी, स्थळ: मातोश्री
कलावती माध्यामिक, उच्च माध्यमिक विद्यालय, हर्सुल सावंगी वेळ सकाळी 7 वा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधापक एम.टी. शेळके, प्रमुख पाहुणे : विलास चंदणे,
व्ही.टी.जाधव,कार्यक्रम: व्यसनमुक्तीवर व्याख्यान, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा,
प्रदर्शन कलापथक
दि.6
रोजी स्थळ : तृप्ती फाऊंडेशन, मौर्य क्लिनिक सातारा परिसर,वेळ स.10 वा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रविण काळे, डॉ.स्वाती काळे, डॉ.संकपाळ, डॉ.बादले,
कार्यक्रम: आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर
दि.7
रोजी स्थळ : प्रौंढ महिला विद्यालय, समर्थ नगर वेळ दुपारी 3 वा. कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्रीमती विमल रंधे, प्रमुख पाहुणे : विलास चंदणे कार्यक्रम : व्याख्यान,
रांगोळी स्पर्धा, गीत स्पर्धा, अनुभव कथन, भाषण स्पर्धा, भावगित भक्ती गीत
दि.8
रोजी स्थळ :
मनापा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बन्सीलाल नगर वेळ स.10 वा. कार्यक्रमाचे
अध्यक्ष मुख्याधापक आसाराम जाधव, प्रमुख पाहुणे: विलास चंदणे सदस्य कार्यक्रम : नशामुक्ती
भारत समिती व्याख्यान, सप्ताहाचा समारोप, प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम.
00000
Comments
Post a Comment