महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर्फे मोफत प्रशिक्षण सोलर पिव्ही इंस्टालेशनचे 5 दिवसीय प्रशिक्षण
छत्रपती
संभाजीनगर, दि.11 (जिमाका):- महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आणि महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळ (MSSIDC)
तसेच एमएसएमई (MSME) यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि.14 ते 18 ऑक्टोंबर
या कालावधीत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मोफत असून सोलर पिव्ही इंस्टालेशन वर
आधारित या प्रशिक्षणा मध्ये सोलर पिव्ही व्यवसायाचे महत्त्व, सोलर पिव्ही शेल व त्यांचे
कार्य, Tilt Angel व सोलर पॅनल
विषयी माहिती, साईट सर्वे करताना घ्यावयाची काळजी, सोलर पॅनल निगा व दुरुस्ती करताना येणाऱ्या समस्या
तसेच त्यावरील उपाय यांची माहिती, त्याची प्रक्रिया शासनाच्या विविध योजना याविषयी
सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
नोंदणी व परवाना या क्षेत्रातील उद्योग संधी मार्गदर्शन, बाजारपेठेबाबत
मार्गदर्शन याबाबत तज्ञ व्याख्यात्या द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. या पाच
दिवशीय प्रशिक्षणामध्ये सह्भागी होणाऱ्या प्रशिक्षणनार्थी कडे उद्यम रजिस्ट्रेशन
(उद्योगाची नोदणी) असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करू
इच्छिणारे सहभागी होऊ शकतात. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या
प्रशिक्षणाच्या अधिक
माहितीसाठी आशा कुरवाडे, (मो. 7888070419)
कार्यक्रम आयोजक, एमसीईडी तसेच प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक,एमसीईडी छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क
साधावा. या प्रशिक्षणात लाभार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री.सुदाम थोटे, विभागीय अधिकारी,एमसीईडी, छत्रपती
संभाजीनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. प्रवेशाची अंतिम दि. 14 ऑक्टोंबर
आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी पत्ता महाराष्ट्र
उद्योजकता विकास केंद्र,ए-38,
एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment