लोकशाही दिन सोमवारी (दि.7)

 छत्रपती संभाजीनगर दि.1(जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. ऑक्टोंबर महिन्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन  सोमवार दि. 7 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 7 रोजी दुपारी 12 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी 11 ते 12 या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक  व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा