म्हैसमाळ येथे सामुदायिक आरोग्य शिबीर
छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- म्हैसमाळ, ता.खुलताबाद येथे सोमवारी (दि.३० सप्टेंबर) सामुदायिक आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात ११३ रुणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून १६ रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित करण्यात आले. सहयोगी प्राध्यापक डॉ.हृषिकेश खाडिलकर, डॉ. श्रीराम गोसावी, डॉ. विकास मकर यांनी सहभाग दिला. तसेच गावातील सचिन गिरी, नरेंद्र भालेराव, बालाजी देशमुख, इंदर जाधव, सत्यजीत गायसमुद्रे यांनीही सहयोग दिला.
०००००
Comments
Post a Comment