आपत्ती व्यवस्थापन जाणीवजागृती रथ; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- आपत्ती व्यवस्थापन जाणीव जागृतीचा चित्ररथ आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आला. हा चित्ररथ गावोगावी जाऊन आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती देणार आहे. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मारुती मस्के, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यावेळी उपस्थित  होते.

            आग ,गर्दी, विविध साथरोग, भूकंप, रस्ते अपघात ,दुष्काळ या परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती चित्ररथावर लेखी स्वरूपात तसेच ऑडिओ स्वरूपात सांगितली जात आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे विमोचनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ही माहिती पुस्तिका नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.

            अधिक माहिती व संपर्कासाठी महत्त्वाचे क्रमांकः- जिल्हा नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर 0240- 2331077   घाटी रुग्णालय-0240-2402422 शहर पोलीस-100/0240-2240500 ग्रामीण पोलीस-100/240-2381633 अग्निशमन दल-0240-2334000/9823270782,  समृद्धी महामार्ग-8181818155/18002332233, रुग्णवाहिका108/102, रेल्वे अपघात हेल्पलाइन 1072 ,रस्ते अपघात हेल्पलाइन,1073.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा