डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन; वाचन प्रेरणा दिन साजरा

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१५ (जिमाका):- माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड व एकनाथ बंगाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त डॉ. चक्रधर कोठी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा