टपाली मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- जेष्ठ नागरिक वय वर्षे ८५ पेक्ष जास्त, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदान प्रक्रियेची सुविधा सहज आणि सोपी पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकाही मतदाराचे मतदान राहणार नाही याची काळजी घेऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी,असे  निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.      

            जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघातील टपाली मतदान प्रक्रियेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, नोडल अधिकारी चंद्रकांत पाटील, प्रादेशिक पर्यटन अधिकारी प्रभोदय मुळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांची उपस्थिती होती.   

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, टपाली मतदान प्रक्रियेतील फॉर्म, विविध नमुने व त्यातील माहिती भरणे, गृह मतदानाच्या दरम्यान मतपत्रिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पोलीस, होमगार्ड, रेल्वे यामध्ये नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचे टपाली मतदान प्रक्रिया करण्यासाठी सर्व संबंधित माहितीचे संकलन करून संबंधितांना टपाली मतपत्रिका वाटप आणि त्यांचे मतदान करून घेणे आवश्यक आहे.  गृह मतदान करून घेत असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही पार पाडावी.पोलीस अधीक्षक ग्रामीण आणि पोलीस आयुक्त कार्यालयाने पोलीस विभागातील नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान प्रक्रियेचा संकलित माहिती करून मतदानाच्या नियोजनासाठी डेटा उपलब्ध करून द्यावा,असेही निर्देश देण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा