मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे आदी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे कुंभार पिंपळगाव ता. घनसावंगी जि. जालना येथील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले.
०००००


Comments
Post a Comment