युवा संवाद कार्यक्रमातून मतदार जनजागृती ;लोकशाही संवर्धनासाठी युवकांचा मतदानात सहभाग महत्त्वाचा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१५ (जिमाका):- आज आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य हे लोकशाही व्यवस्थेमुळे मिळत आहे. या लोकशाहीला अधिक निकोप व बळकट करुन तिच्या संवर्धनासाठी युवकांचा मतदानात अधिकाधिक सहभाग असणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
एमजीएम
विद्यापीठात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात युवा मतदारांमध्ये मतदार जनजागृती
करण्यात आली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रुक्मिणी
सभागृहात आयोजित कार्यक्रमास कुलगुरु डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गडेकर, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी निलम बाफना, रासेयो समन्वयक डॉ.
आर.आर.देशमुख, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, महाविद्यालयीन काळ हा जीवनातील सर्वोत्तम काळ आहे. शिक्षण घेऊन
आपण जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होतात. त्यासाठी शिक्षित होण्यासोबत
संस्कारित होणे आवश्यक आहे. सदैव आदरस्थानी असणाऱ्या आई वडील, गुरुजनांशी सहज खोटे
बोलून त्यांना फसवत असतो. मात्र ही त्यांची फसवणूक नसून आपली स्वतःची फसवणूक आहे. विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास हवा मात्र फाजिल आत्मविश्वास नसावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक
आपणास ओळखता आला पाहिजे. अंतिमतः बौद्धिक विकास हाच खरा विकास आहे,असे त्यांनी
सांगितले.
जिल्हाधिकारी
स्वामी पुढे म्हणाले की, आपल्या देशातील लोकशाहीमुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेले
अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव आपणास असणे आवश्यक आहे. त्याप्रति जागरुकता
येण्यासाठी युवकांनी मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावायला हवे. पर्यावरण रक्षण,
आरोग्य, व्यसनमुक्ती, सोशल मिडियावरील जबाबदार वर्तन अशा विविध क्षेत्रात आपण आपले
योगदान देऊ शकतात,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
अध्यक्षीय
समारोप कुलगुरु डॉ. सपकाळ यांनी केला. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
०००००






Comments
Post a Comment