विधानसभा निवडणूक २०२४ :जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कन्नड मतदार संघातील पूर्वतयारीचा आढावा

 






छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):- १०५ कन्नड विधानसभा मतदार संघाचा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

            आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गोरड , तहसिलदार विद्याचरण कडवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड ,गटविकास अधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी चंद्रहार ढोकणे,यतिन कोठावळे तसेच सर्व झोनल अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी कन्‍नड तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख, नोडल अधिकारी व झोनल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट दिली. तसेच साहित्‍य वाटप, जमा करणे, स्‍ट्रॉंग रुम येथे भेट देऊन पाहणीही केली.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण करीत असलेल्या कामाचे पूर्ण ज्ञान असले पाहिजे. निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा विचार करुन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. या सर्व सुचनांची माहिती आपण घेतली पाहिजे. मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घ्यावा. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करुन सज्ज असावे,असे निर्देश त्यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा