महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, सहा. आयुक्त समाजकल्याण पी.जी. वाबळे, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे, बारवाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.


Comments
Post a Comment