सामुदायिक आरोग्य शिबीर

 छत्रपती संभाजीनगर, दि.7(जिमाका):- राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, उपमुख्यमंत्री गृह, विधी व न्याय यांचे कार्यालय, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या समन्वयाने विनामुल्य सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून विनामुल्य रोगनिदान, विनामुल्य रक्त-लघवी चाचणी, इ.सी.जी. तपासणी, विनामुल्य शिबिरापश्चात आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया, विनामुल्य आयुष्यमान भारत कार्ड वितरण इ. सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.

दि.4 ऑक्टोंबर  शुक्रवार रोजी एस.टी. कॉलनी, जाधववाडी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मागदर्शनाखाली हे शिबीर राबविण्यात आले. एकूण 141 लाभार्थींची आरोग्‍य तपासणी करण्यात आली असून, 21 रुग्णांच्या रक्त- लघवी चाचणी व 25 रुग्णांच्या इ.सी.जी. तपासणी करुन 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात संदर्भित केले आहे.

या शिबिराच्या यशस्वतीतेसाठी अधिष्ठात डॉ.शिवाजी सुक्रे, जनौषद वैद्यकशास्त्र प्रमुख डॉ.भारत चव्हाण, शासकीय कर्करोग रुग्णालय विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, यांचे अनमोल सहाकार्य मिळाले.

शिबिराचे नेतृत्व प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. ऋषीकेश खाडीलकर, सहायक प्राध्यापक डॉ. श्रीराम गोसावी, जनौषदकवैद्यकशास्त्र सहायक प्राध्यापक डॉ.विकास मकर यांच्या मार्गदर्शानाखाली विविध विभागातील विशेषज्ञ डॉक्टर, औषध वैद्यकशास्त्र विभाग, शल्यचिकित्सक विभाग, स्त्रीरोग तज्ञ, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी रुग्णांना सेवा दिली. कनिष्ठ निवासी डॉक्टर, अंतरवासीता डॉक्टर, अधिपरिचारिका, औषधनिर्माता, समाजसेवा अधिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इ.सी. जी. तंत्रज्ञ यांनी शिबिरात सहभाग नोंदविला.

आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी आयोजक पूनम गंगावणे, नरेंद्र भालेराव, बालाजी देशमुख, इंदर जाधव, सत्यजीत गायसमुद्रे, तसेच त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा