मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर,दि.३(जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथील विमानतळावर आज सकाळी ११ वाजून ५८ मि. नी आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आमदार संजय सिरसाट तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे,मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते. येथून मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टरने बुलडाणा जिल्ह्यातील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
००००००





Comments
Post a Comment