स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा:सिल्लोड येथे सोमवार (दि.७) पासून; १० जिल्ह्यातील ४०० खेळाडूंचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन सिल्लोड येथे सोमवार दि.७ पासून करण्यात येत आहे. राज्यातील १० जिल्ह्यातील ४०० कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होणार असून दि.१० पर्यंत या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील कुस्तीप्रेमी क्रीडा रसिकांसाठी पर्वणीच लाभणार आहे.
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती
स्पर्धेचे आयोजन सिल्लोड येथे होत आहे. या आयोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. बैठकीस जिल्हा
क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तसेच महाराष्ट्र कुस्ती
संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा
स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन सिल्लोड येथे करण्यात येणार आहे. सोमवार दि.७ ते गुरुवार दि.१० दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायं.४ ते
रात्री ९ या कालावधीत हे आयोजन होईल.
या स्पर्धेत राज्यातील १० जिल्ह्यातील
संघ सहभागी होतील. त्यात स्थानिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाही संघ सहभागी असेल. सर्व खेळाडू व पंच, प्रशिक्षक मिळून ४०० जण या स्पर्धेसाठी
येणार आहेत. फ्री स्टाईल व ग्रीको रोमन पद्धतीने
या कुस्ती स्पर्धा ‘मॅट’ वर खेळल्या जातील.
या स्पर्धेत महिला व पुरुष खेळाडुंचे संघ सहभागी होतील. पुरुषांसाठी वजन गट ५७ ते १२५ किलो ग्रॅम तर महिलांसाठी
५७ ते ७७ किलोग्रॅम अशा वजनगटात या स्पर्धा होतील.
या स्पर्धेचे आयोजन हे सिल्लोड येथील सहकारी
सुतगिरणीच्या रिकाम्या जागेत करण्यात येत आहे. तेथे ५० फुट X१५० फुट आकाराचे स्टेज करण्यात येणार असून त्यावर १२ मिटर
X १२ मिटर आकाराच्या तीन मॅट लावण्यात येतील व त्यावर या स्पर्धा होणार आहेत. तसेच
स्पर्धा पाहता याव्या यासाठी १ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी प्रेक्षक गॅलरीही तयार
करण्यात येणार आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अल्पसंख्याक,
औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवार दि.७ रोजी दुपारी १२ वाजता करण्याचे नियोजन
करण्यात आले आहे.
विजेत्या खेळाडूंना विविध बक्षिसे दिले
जाणार आहेत. त्यात ७५ हजर अते २५ हजार पर्यंतची बक्षिसे आहेत. शिवाय इतर गटातील विजेत्यांना ४० हजार ते २० हजार पर्यंतची बक्षिसे आहेत.
०००००
Comments
Post a Comment