वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे आज (दि.५) पासून दोन दिवसीय रोजगार शिबीर मेळावा
छत्रपती संभाजीनगर,दि.४(जिमाका):-इतर मागास बहुजन कल्याण विभाग, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व अन्य उपकंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.५ व रविवार दि.६ रोजी रोजगार शिबीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १० वा. लोकनेते गोपिनाथराव मुंडे वंजारी भवन, एन ४ सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment