मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाः जिल्ह्यातील ८०० भाविकांचा पहिला गट आज(दि.६)अयोध्येस होणार रवाना
छत्रपती संभाजीनगर,दि.५(जिमाका):-मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत जिल्ह्यातील ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला गट रविवार दि.६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे श्रीराम मंदीर येथील यात्रेसाठी रवाना होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दूरदृष्यप्रणालीद्वारे यात्रेकरुंना शुभेच्छा देणार आहेत. तर पालकमंत्री अब्दुल सत्तार हे हिरवी झेंडी दाखवणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ व पणन मंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दृरदृष्यप्रणालीद्वारे
भाविक प्रवाशांना शुभेच्छा देणार आहेत. सकाळी ११ वाजता ही विशेष रेल्वे अयोध्येकडे
रवाना होईल.
०००००
Comments
Post a Comment