विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान यंत्रांचे (मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट) आज प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने व ईएमएस या संगणक प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत हे यादृच्छिकीकरण करण्यात आले.
यासंदर्भात उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी उपस्थित राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींना ही प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी शिवसेना(उद्धव
बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), बहुजन समाज पार्टी, समाजवादी
पार्टी इ. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व मतदान यंत्रांचे नोडल अधिकारी एकनाथ बंगाळे उपस्थित
होते.
माहिती
देण्यात आली की, जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघ मिळून ३२६४ मतदान केंद्र आहेत.
त्यात ९ तात्पुरत्या मतदान केंद्रांची वाढ गृहित धरुन एकूण मतदान केंद्र ३२७३ होतील.जिल्ह्याला
सध्या प्रथमस्तरीय तपासणी करुन सज्ज असलेले ७१९० मतदान यंत्रे, ३९२६ कंट्रोल
युनिट, ४२५० व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध आहेत.
राखीव
२० टक्के यंत्रासह प्रत्येक मतदार संघनिहाय वितरीत करावयाची यंत्र संख्या
याप्रमाणे- सिल्लोड-४८७, कन्नड-४४१, फुलंब्री-४४५, औरंगाबाद मध्य-३८४, औरंगाबाद
पश्चिम-४८१, औरंगाबाद पूर्व -३८६, पैठण-४२१, गंगापूर-४४६, वैजापूर-४२३ यंत्रांचे
वितरण करावयाचे आहे. त्यासाठी आजचे प्रथमस्तरीय यादृच्छिकीकरण करण्यात आले. यानंतर
संबंधित यंत्रे ही त्या त्या विधानसभा मतदारसंघात कलर कोड सह बंद कंटेनरमध्ये व
पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात येतील. तेथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या
उपस्थितीत पुढील प्रक्रिया करण्यात येईल. मतदानाच्या १० दिवस आधी ९ किंवा १० तारखेला
निवडणू निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे यादृच्छिकीकरण होईल. त्यावेळी मतदान यंत्र,
कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांच्या जोड्या लावल्या जातील. त्यानंतर मतदान
यंत्रांवर तज्ज्ञ अभियंत्यांच्या उपस्थितीत मतपत्रिका लावून यंत्रे सज्ज केले
जातील. उमेदवारी अर्ज माघारीनंतर मशिन्सवर लावण्यासाठीच्या मतपत्रिका तयार
होतील,अशी माहिती देण्यात आली.
०००००
Comments
Post a Comment