मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन व स्वागत
छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी २ वा ३५ मि. नी येथील विमानतळावर आगमन झाले.त्यांच्या समवेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचेही आगमन झाले.प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, सिडको अध्यक्ष आ. संजय शिरसाट,खा. डॉ. भागवत कराड,आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ.सतीश चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदी उपस्थित होते.
००००००


Comments
Post a Comment