इच्छुक उमेदवार व प्रतिनिधींसाठी मंगळवारी (दि.२२) प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):-  विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी मंगळवार दि.२२ रोजी सकाळी १० वा. प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी १० वा. हे प्रशिक्षण होणार असून या प्रशिक्षणात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया, विविध परवानग्या, प्रचार साहित्याबाबत परवानगी, खर्च सादर करणे इ. बाबतीत माहिती दिली जाणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा