विधानसभा निवडणूक २०२४ :नोडल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणातून जिल्हाप्रशासनाची सज्जता; सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका) :- आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. निवडणूकीचे कामकाज करतांना सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
नियोजन सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणास उपजिल्हा निवडणूक
अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल लांजेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी
प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख नोडल अधिकारी ,
सहा. नोडल अधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात मतदान यंत्रांची तपासणी, मतदान केंद्रावरील
व्यवस्था, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार जनजागृती (स्वीप), मतदान प्रक्रिया, कायदा
व सुव्यवस्था, मिडीया कक्ष अशा विविध विषयांवर सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देण्यात
आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणुकीच्या कामकाजात पूर्णतः
निष्पक्षता व पारदर्शकता बाळगणे आवश्यक असते. त्यासाठी नियमांची परिपूर्ण माहिती व
अभ्यास असणे आवश्यक आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी नियमांचा अभ्यास करावा व आपल्या अधिनस्त
कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करावे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय कर्मचाऱ्यांचे
प्रशिक्षण घ्यावे. मतदार जनजागृती करुन नैतिक मतदानाचे महत्त्व मतदारांना पटवून
द्यावे,असेही त्यांनी सांगितले.
०००००
Comments
Post a Comment