बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार; जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्र व २६ आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश

 


       छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):-    वैद्यकीय संस्थामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो. सन २०२३-२४ या वर्षासाठी  जिल्ह्यातील बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून जिल्हयातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.

 

             आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम दोन लाख रुपये आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी,आळंद,जातेगांव, बाबरा, वेरुळ, गदाना, दौलताबाद,पिंपळवाडी,कचनेर, सि.वाडगांव. चापानेर, करंजखेडा या १२ प्राथमिक आरोग्य केद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारीतोषिक मिळाले आहे. तसेच किनगांव आरोग्य वर्धिनी केंद्रास १ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परिबावडा आरोग्य वर्धिनी केंद्रास ५० हजार रुपये प्रथम उत्तेजनार्थ तसेच पार्थी आरोग्य वर्धिनी केंद्रास ३५ हजार रुपयांचा व्दितीय उत्तेजनार्थ पुरस्कार  जाहीर झाला आहे. तसेच तिसगांव, सुलतानपुर, जेहुर, टाकळीराजा, बहीरगांव, पाडाळी, कृष्णापुर, बोकुडजळगाव, मंगरुळ, पंढरपुर, चौका, डिग्गी, जिकठाण, पिसादेवी, आडगांव बु., सोलनापुर, चिंचडगाव, जटवाडा, सावंगी, माळीवडगांव, येसगांव, गेवराई बु.,घटांब्री, वाकला या आरोग्य वर्धिनी केंद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

 

           ग्रामीण नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा देऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक मुंढे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. वासेफ सिददीकी यांनी कौतूक केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा