रविवारी (दि.६) लाडक्या बहिणींचा सन्मान व राज्यस्तरीय योजनांचे लोकार्पण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांची उपस्थिती

 छत्रपती संभाजीनगर,दि.५(जिमाका):-मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा  रविवार दि.६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

            खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वा. हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार,  यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,कृषी मंत्री धनंजय मुंदे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेता आ. अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्यसभा सदस्य  खा.डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. सतिष चव्हाण,  आ. विक्रम काळे, विधान सभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपूत यांचीही उपस्थिती राहणार असून उर्जा विभगाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव,  विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, बीड चे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड  उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास सुवर्णा जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा