विधानसभा निवडणूक २०२४: मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आज (दि.१९) अखेरची संधी; मतदार यादीत नाव नोंदवा आणि मतदानाचा हक्क बजवा- विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ (जिमाका):- विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणूकीत मतदान करता यावे यासाठी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शनिवार दि.19 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे, तरी छत्रपती संभाजीनगर विभागातील व जिल्ह्यातील पात्र मतदारांनी आपली नावे नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदारांना केले आहे.
विधानसभा
निवडणूक 2024 करीता मतदान करण्यासाठी आपण
पात्र असाल मात्र आपले नाव मतदार यादीत नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. शनिवार दि. 19 ऑक्टोबर ही मतदार यादीत नाव
नोंदविण्यासाठी शेवटची तारीख आहे. दि.19 ऑक्टोबर पर्यंत आपण मतदार होऊ शकता.
यासाठी वोटर हेल्पलाइन हे मोबाईल ॲप, www.voters.eci.gov.in या वेबसाइटवर सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मतदार
नोंदणीचा फॉर्म नमुना 6 भरु शकता. किंवा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन
मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनचीही मदत घेऊ शकता.
मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया ही नामनिर्देशन
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद
केली नाही त्या सर्वांनी आपली नावे उद्या म्हणजेच शनिवार दि.19 रोजी या दिवसात मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी
प्रयत्न करावेत.
1 ऑक्टोबर 2024 पर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केले आहे असे
तरूण तरुणीही मतदार होण्यास पात्र आहेत. आपल्या
मोबाइलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून याबाबतची माहिती मिळू शकते. तसेच www.voters.eci.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी,असे आवाहनही जिल्हा
प्रशासनाने केले आहे.
000000

Comments
Post a Comment