विधानसभा निवडणूक २०२४ : निवडणूक निरीक्षक (खर्च) यांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण
छत्रपती संभाजीनगर, दि.४(जिमाका):- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक(खर्च) कोटापट्टी वाम्शी क्रिष्णा (भा.म.व ले.सेवा) व सोभान सुत्रधार(भा.म.व ले.सेवा) हे दाखल झाले आहेत.
त्यांचे निवास व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
१.
श्री.
कोटपती वाम्शी क्रिष्णा (भा.म.व ले.सेवा) (१०४- सिल्लोड, १०५- कन्नड, १०६- फुलंब्री,
१०७-औरंगाबाद(मध्य), १०८-औरंगाबाद(पश्चिम)), निवास- सुभेदारी विश्रामगृह अजंता इमारत
कक्ष क्रमांक ८ अ. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४४. भेटीची वेळ- दुपारी साडेचार ते साडेपाच
वा.
२.
श्री.
सोभान सुत्रधार(भा.म.व ले.सेवा) (१०९-औरंगाबाद(पूर्व), ११०-पैठण, १११-गंगापूर, ११२
वैजापूर), निवास- सुभेदारी विश्रामगृह अजंता
इमारत कक्ष क्रमांक ५अ. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५३७. भेटीची वेळ- सकाळी साडेसात ते नऊ
वा.
सामान्य नागरिक, मतदार वरील वेळी व ठिकाणी
निरीक्षक महोदयांना भेटू शकतात.
नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी दिलेल्या वेळेत
भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००
Comments
Post a Comment